डॉ. आय.जी. पटेल फाऊंडेशनच्या पुढाकाराने राबवण्यात येणाऱ्या “कॅन्सर म्हणजे अंत नव्हे” या मोहिमेअंतर्गत सत्यविष्णू रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत एका कॅन्सरग्रस्त रुग्णाने आपल्या संघर्षमय प्रवासाचा अनुभव मांडला.
या मोहिमेचा उद्देश कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि उपचारांद्वारे रुग्णांना दिलासा देणे आहे. आजवर हजाराहून अधिक कॅन्सर रुग्णांनी या उपचार पद्धतीच्या साहाय्याने कॅन्सरवर विजय मिळवला आहे.
पत्रकार परिषदेत एका रुग्णाने आपला अनुभव सांगितला. बेंगळुरूतील डॉक्टरांनी तिचा आजार बरा होणे अशक्य असल्याचे सांगितले होते. अशा परिस्थितीत, तिच्या कुटुंबीयांनी तिला सत्यविष्णू रुग्णालयात दाखल केले. डॉ. आय.जी. पटेल यांनी तिच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. तिचा कॅन्सर चौथ्या स्टेजच्या पुढे गेला होता आणि शरीरभर पसरला होता. १२ दिवस ऑक्सिजनवर राहिल्यानंतर, सध्याच्या परिस्थितीत तिचा कॅन्सर जवळपास पूर्णपणे बरा झाला आहे.
रुग्णाने तिचा अनुभव सांगताना, “मी आज नॉर्मल जीवन जगत आहे. ऑक्सिजनची गरज नाही आणि मी स्वतःच्या पायावर चालू शकते,” असे नमूद केले.
डॉ. आय.जी. पटेल फाऊंडेशनने कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवून मोठे आर्थिक सहाय्य उपलब्ध केले आहे. सत्यविष्णू रुग्णालय व सिल्व्हरलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
ही मोहीम कॅन्सरग्रस्त रुग्णांना नवी उमेद आणि आत्मविश्वास देत असून, “कॅन्सर म्हणजे अंत नव्हे” हे समाजासमोर अधोरेखित करत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*