हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयोजित केलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगरने उल्लेखनीय प्रगती केली आहे. शहराने PM10 (धुलीकण) एकाग्रतेमध्ये 8% घट घडवून आणली असून, हवेची गुणवत्ता 300 हून अधिक दिवस चांगली राखल्यामुळे 2.77 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
शहराचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात शहरातील मुख्य रस्त्यांवर व्हर्टिकल गार्डन्स बसवणे, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, वाहतूक बेटांमध्ये कारंज्यांची उभारणी करणे, स्विपिंग मशीनने रात्री रस्ते स्वच्छ करणे आणि धूळ कमी करण्यासाठी पाण्याने धुण्याचे काम करण्यात येत आहे.
शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी मनपा उपायुक्त रवींद्र जोगदंड, अभियंता ए. बी. देशमुख, उद्यान अधिकारी विजय पाटील, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, तसेच NCAP चे सल्लागार गीतांजली कौशिक व त्यांच्या टीमचा मोठा वाटा आहे. या सामूहिक प्रयत्नांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने घेतलेल्या या पुढाकारामुळे, हवेच्या गुणवत्तेमध्ये सकारात्मक बदल झाले असून, भविष्यात या उपक्रमांचा शहराच्या पर्यावरणावर अधिक चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*