छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक सोनेरी महाल पुढील सहा महिने पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महालाच्या जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे ही बंदी लागू करण्यात आली आहे. सहायक अभिरक्षक अमृत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महालाच्या दुरुस्तीनंतर पर्यटकांसाठी ते पुन्हा खुलं करण्यात येईल.
सोनेरी महालामध्ये १९८५ मध्ये वस्तुसंग्रहालय सुरू करण्यात आलं होतं, ज्यात सातवाहन काळापासून १२व्या शतकापर्यंतच्या ऐतिहासिक शिल्पं, मूर्ती आणि वस्तूंचा समावेश आहे. पावसाळ्यात महालाला तडे गेल्याने गळती सुरू झाली होती, ज्यामुळे ऐतिहासिक वस्तू खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या कामासाठी ४ कोटी ५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*