मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा समाजाने आज (रविवार) सकाळी जिजाऊ चौकात सव्वा तासाचा रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पोलीस प्रशासनाने आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले, मात्र आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले, त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला. अखेरीस पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन स्थगित केले.
मनोज जरांगे पाटील हे मागील एक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत. ओबीसी आरक्षण मिळवून देण्याची मागणी आणि “सगे सोयरे कायदा” पारित करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला सप्टेंबर महिन्यापर्यंतची मुदत दिली होती. मात्र, सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्याने पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील जिजाऊ चौकात झालेल्या आंदोलनावेळी सुरेश वाकडे, सुनील कोटकर, सतीश वेताळ आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*