सेव्हन हिल उड्डाणपुलावरून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या मद्यधुंद कारचालकाने रविवारी रात्री आठच्या सुमारास आकाशवाणी चौक परिसरात सहा गाड्यांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या जिल्हा परिषद सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छाया पळसकर (वय ६०) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर मद्यधुंद चालकाने कार आकाशवाणीच्या पाठीमागील गल्लीत सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा थरार

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची फोर्ड कंपनीची आलिशान कार सेव्हन हिल उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने आकाशवाणी चौकाच्या दिशेने येत होती. यावेळी जि.प.च्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छाया पळसकर यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. कारने यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षासह इतर चार गाड्यांनाही धडक दिली.

चालकाचा पळण्याचा प्रयत्न

अपघातानंतर कारचा पुढील टायर फुटल्याने वाहतूक पोलिसांनी चालकाला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना हुलकावणी देत कार फ्रीडम टॉवरकडे वळवली. शेवटी, सिंधी कॉलनीत कार रस्त्यावर सोडून चालकासह अन्य एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

दारूच्या बाटल्या सापडल्या

अपघातग्रस्त कारच्या मागील सीटवर आणि डिक्कीत महागड्या दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून कारचालकाचा शोध सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,219 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क