फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण फाट्याजवळ पत्ते खेळण्याच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. मदन रावण बिघोत (वय ४२, रा. डोंगरगाव शिव, ता. फुलंब्री) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी आकाश कौतिक खंडाळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री पत्ते खेळताना मदन बिघोत आणि आकाश खंडाळे यांच्यात वाद झाला होता. पत्ता सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या या वादातून दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. रविवारी सकाळी पुन्हा ते दोघे आमने-सामने आले, आणि त्याच वादाचे रूपांतर खुनात झाले. आकाश खंडाळे याने जवळ असलेल्या चाकूने मदन बिघोत यांच्या छातीवर वार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

फुलंब्री पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला आणि आकाश खंडाळे याला खुलताबाद मार्गे भुसावळकडे जात असताना अटक केली. प्राथमिक चौकशीत खंडाळे याने खुनाची कबुली दिली आहे. त्याला फुलंब्री पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, याप्रकरणी मृत मदन बिघोत यांच्या पत्नी अनिता बिघोत यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुलंब्री पोलीस करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,523 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क