रामगिरी हॉटेल परिसरात झोपलेल्या ७९ वर्षीय वृद्धावर एका दारुड्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २१ सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने पीडित वृद्धावर कपडे फाडून अत्याचार केले आणि प्रतिकार करताच त्यांच्याकडून १ हजार रुपये हिसकावून घेतले. यानंतर आरोपीने वृद्धाच्या अंगावर लघुशंका केली. सिडको पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

विक्रम ऊर्फ भुऱ्या धरमसिंग राजपूत (रा. सेवनहिल उड्डाणपुलाखाली) असे आरोपीचे नाव असून, सीसीटीव्ही फुटेज आणि पीडित वृद्धाच्या वर्णनावरून आरोपीला अटक करण्यात आली.

अधिक माहितीनुसार, पीडित वृद्धाचा मुलगा नसल्याने त्यांची पत्नी मुलगी आणि जावयाकडे मुकुंदवाडी भागात राहते. वर्षभरापूर्वी कुटुंबातील वादामुळे वृद्धाने घर सोडले आणि तेव्हापासून ते भीक मागून जीवन जगत आहेत. २१ सप्टेंबरच्या रात्री रामगिरी हॉटेल परिसरात झोपलेल्या वृद्धावर आरोपीने हल्ला केला.

 

घटनेनंतर सिडको पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि वृद्धाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध लुटमार आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक प्रमोद देवकते करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,033 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क