RTE Admission Lottery Results Announced, Parents Rush for Confirmation

छत्रपती संभाजीनगर : बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना पहिल्या वर्गात मोफत प्रवेशासाठी सुरू असलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर पुण्यात शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. या सोडतीनुसार पहिल्या यादीत ज्यांची नावे आले, त्यांना त्याविषयीचे संदेश 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी पालकांच्या मोबाइलवर पाठवले जाणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

त्यानुसार, पालकांना मेसेज प्राप्त होताच प्रवेश निश्चित करण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. लॉटरी लागलेल्या मुलांच्या पालकांनी निर्धारित कालावधीमध्ये संबंधित शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल. अन्यथा, जागा दुसऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाऊ शकतात.

आरटीई अंतर्गत महाराष्ट्रभर हजारो पालकांनी अर्ज दाखल केले होते. आता पहिल्या टप्प्यात ज्या मुलांना प्रवेश मिळाला आहे, त्यांची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पालकांची शाळांकडे धाव सुरू होणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले असून, पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सर्व आवश्यक कागदपत्रांसह शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी अनेक पालकांनी माहितीच्या अभावामुळे प्रवेश गमावला असल्याने यावेळी पालकांना वेळीच जागरूक राहण्याचा सल्ला शिक्षण विभागाने दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

895 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क