शेतातील गवत उपटण्याच्या कारणावरून तोंडोळी येथे शनिवारी दोन भावांमध्ये झालेल्या वादातून मोठी हिंसाचाराची घटना घडली आहे. या वादात एका भावाने लाकडी दांड्याने मारहाण करून आपल्या सख्या भावाचा खून केला. नसिरुद्दीन करीमोद्दीन शेख (वय ५५ वर्षे) रा. तोंडोळी, ता. पैठण अशी खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
बिडकीन पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, शेतातील गवत जनावरांसाठी घेण्यावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन आरोपी मोईन शेख यांनी लाकडी दांड्याने नसिरुद्दीन यांच्यावर वार केले. डोक्यावर, हातांवर, पाठीवर आणि कमरेवर झालेल्या गंभीर मारहाणीत नसिरुद्दीन शेख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी बिडकीन येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने गावात खळबळ माजली असून परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. मयताचा मुलगा असलम शेख यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मोईन शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*