शहरातील दर्गा रोडवरील फॅरेटलेन या ज्वेलरी दुकानात स्कार्फ बांधून आलेल्या दोन महिलांनी तब्बल १ लाख ३१ हजार रुपयांच्या हिरेजडीत बांगड्या चोरल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याबाबत दुकानातील मॅनेजर आकाश विठ्ठल शिंदे यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोन महिला स्कार्फ घालून दुकानात आल्या. त्यावेळी दुकानातील स्टाफ जेवणासाठी बाहेर गेला होता, आणि दुकानात दोनच महिला कर्मचारी उपस्थित होत्या. या परिस्थितीचा फायदा घेत, एक चोरट्या महिलेने दागिने दाखविण्याच्या बहाण्याने दुकानातील महिला कर्मचाऱ्यांना गुंतवून ठेवले, तर दुसऱ्या चोरट्या महिलेने काउंटरमध्ये घुसून स्टँडसह हिरेजडीत बांगड्या चोरल्या आणि स्कार्फमध्ये लपवून पळ काढला.
हा प्रकार ऑडिटदरम्यान उघडकीस आल्यानंतर, १८ सप्टेंबर रोजी रात्री फिर्याद दाखल करण्यात आली. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू असून, पुढील तपास हलवादार गुप्ता करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*