१७ सप्टेंबर रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत रांजणगाव येथील २१ वर्षीय तरुण अभय सुधाकर गावंडे याचा गणेश विसर्जनाच्या वेळी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना घाणेगाव पाझर तलावात सायंकाळी घडली.
अभय गावंडे (वय २१, रा. नर्सरी कॉलनी, रांजणगाव, ता. गंगापूर) हा त्याच्या दोन मित्रांसह गणेश विसर्जनासाठी तलावात उतरला होता. मूर्तीसह तलावात उतरत असताना त्याला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडाला. मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र त्यांना पोहता येत नसल्याने ते काहीच करू शकले नाहीत. घटनास्थळी धावलेल्या स्थानिक तरुणांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला, मात्र अभयचा मृतदेह काही वेळानंतरच सापडला.
अभय हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील सुधाकर गावंडे हे उद्योगनगरातील एका खाजगी कंपनीत कामगार आहेत. अभयने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला होता, मात्र विसर्जनाच्या वेळी त्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे, आणि पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*