सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ ३ हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
राज्यभरात एकूण ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र ठरले आहेत. विभागवार पात्र अर्जांची संख्या अशी आहे: मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१, पुणे विभागात ९१ हजार ६२५, अमरावती विभागात १ लाख ३२ हजार ७५८, नागपूर विभागात १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६ आणि लातूर विभागात ७१ हजार ४७४.
योजना ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर अशा उपकरणांच्या खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच, राज्य शासनाद्वारे मान्यता प्राप्त योगोपचार केंद्रे आणि मानसिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांना प्रशिक्षण आणि प्रबोधनाची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. (मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा फॉर्म येथे डाउनलोड करा). हा फॉर्म व्यवस्थित भरून. ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सबमिट करा.
फॉर्ममध्ये पासपोर्ट साईज फोटो चिकटवा. आणी तुमचे संपूर्ण नाव, तुमचे वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आणी विचारलेली ईतर माहिती भरा.
तुम्हाला मागील तीन वर्षांत तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही याबद्दलचे घोषणापत्र भरायचे आहे. फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म जमा करा.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयातील सहायक आयुक्तांशी संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*