छत्रपती संभाजीनगर : भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला. सुदैवाने वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला असून, पंकजा मुंडे पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार होत्या. या सभांसाठी त्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार होत्या. मात्र हेलिकॉप्टर उड्डाण घेणार इतक्यातच त्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या घटनेमुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील नियोजित प्रचारसभांच्या वेळापत्रकात बदल करावा लागला. कार्यकर्ते आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांच्या कार्यालयाकडून तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. काही वेळातच त्या लातूरकडे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे कार्यक्रमांना काहीसा विलंब झाला असला तरी पंकजा मुंडे या लातूरमधील सर्व नियोजित प्रचारसभांना उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंकजा मुंडे सुरक्षित असल्याची माहिती मिळताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

809 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क