शहरातील पाणीपुरवठ्याचा वीज खर्च कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शहरात ७००, १२०० आणि ९०० मिलिमीटर या तीन जलयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो, ज्यामुळे दर महिन्याला सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचे वीज बिल महावितरणकडे जमा करावे लागते. वाढत्या वीज बिलामुळे आर्थिक ताण वाढत असून, अनेकदा वीज बिल भरण्यात दिरंगाई झाल्यास महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली जाते.
महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी सौरऊर्जा वापरून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यास या योजनेसाठी १०० एकर जागेवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करावे लागेल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेचा वीज खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करून शहराचा विकास साधता येईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*