छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ कथाकार आणि कादंबरीकार रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे आज वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. ग्रामीण जीवनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या त्यांच्या लेखनशैलीने मराठी साहित्यविश्वात वेगळा ठसा उमटवला होता.

रा. रं. बोराडे यांची लेखनशैली साधी-सोपी आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. त्यांच्या कथांचा शेवट हा नेहमी धक्कादायक असतो, जो वाचकांना अंतर्मुख करतो. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण पात्रे उभी राहत असत. ‘पाचोळा’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीमुळे त्यांना ‘पाचोळा’कार बोराडे म्हणूनही ओळखले जात होते.

बोराडे यांच्या लेखनातून मराठवाडी बोलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या निधनाने ग्रामीण साहित्यातील एक महत्त्वाचा स्तंभ हरपल्याची भावना साहित्यविश्वातून व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

818 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क