Women Opt Out of Ladki Bahin Yojana

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना असून, जिल्ह्यात या योजनेसाठी दहा लाखांपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले होते. यामधून ९ लाख ७८ हजार महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने या योजनेअंतर्गत अपात्र महिलांनी लाभ नाकारण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन केले होते. काही जिल्ह्यांमध्ये अपात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यात येत असून, ही प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून सतत तपासणी केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशाच ७० महिलांनी योजनेचा लाभ न घेण्यासाठी महिला बालविकास विभागाकडे अर्ज दाखल केला आहे. हे अर्ज स्वतःहून देण्यात आले असून, शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे यातून दिसून येते.

दरम्यान, अपात्र लाभार्थ्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार लाभ घेण्यास अपात्र असलेल्या महिलांनी स्वतःहून अर्ज करून योजना नाकारल्यास इतर पात्र महिलांना लाभ मिळण्यास अधिक सहकार्य होणार आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशीच प्रक्रिया राबवली जात असून, संपूर्ण छाननीनंतर लाडकी बहीण योजनेच्या अंतिम लाभार्थ्यांची यादी निश्चित केली जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,297 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क