टॉयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) कंपनीला आज छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन उत्पादन प्रकल्पासाठी ८२७ एकर जमीन मंजूर करण्यात आली. महाराष्ट्र औद्योगिक टाउनशिप लिमिटेडच्या (MITL) अंतर्गत विकसित होत असलेल्या शेंद्रा आणि बिडकीन या स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी प्रकल्पात ही जमीन देण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
टीकेएमने ३१ जुलै रोजी राज्य सरकारसोबत करार केला होता. या करारानुसार कंपनी विद्युत आणि हायब्रिड वाहनांसाठी ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा उभारणार आहे. या प्रकल्पात २१,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, जानेवारी २०२६ पर्यंत उत्पादन सुरू होईल. यामुळे ८,००० थेट आणि १८,००० अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराराच्या वेळी सांगितले होते की, या प्रकल्पामुळे दरवर्षी ४ लाख विद्युत आणि हायब्रिड कारचे उत्पादन होणार असून, यामुळे महाराष्ट्रातील वाहन उद्योगात क्रांती घडणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*