छत्रपती संभाजीनगर: शहरातील गारखेडा परिसरातील काबरानगर येथे घरफोडीची मोठी घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घर बंद असल्याची संधी साधून चोरी
फिर्यादी विजेंद्र कचरु खरात हे आपल्या कुटुंबासह अंत्यविधीसाठी बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काल दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश करून कपाट फोडले. या चोरीत सोन्याच्या बांगड्या, नेकलेस, अंगठ्या, कानातले, पेन्डंट आणि रोख ₹२ लाख रुपये असा एकूण ₹७,०७,५०० किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे पुढील तपास करत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*