आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत आचारसंहिता भंग झाल्यास, नागरिकांनी तात्काळ सी-व्हिजील मोबाईल अॅपवर किंवा १९५० या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना तत्काळ तक्रारी दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी cVIGIL अॅपद्वारे तसेच १९५० या क्रमांकावर फोन करून तक्रारी करता येतात. प्राप्त झालेल्या तक्रारींची क्षेत्रीय पथकाद्वारे शहानिशा करून त्यावर १०० मिनिटांत कारवाई करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हा आणि विधानसभा क्षेत्रनिहाय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
बंदुकांचे प्रदर्शन, मद्य वाटप, पैसे वाटप, सरकारी मालमत्तेचे विद्रुपन, बनावट बातम्या, मतदारांची वाहतूक, भेटवस्तू वाटप, पेड न्यूज, जाती तेढ निर्माण करणारे भाषण, धमकी असे आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास नागरिकांनी फोटो, व्हिडिओ, ऑडिओद्वारे तक्रारी दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*