महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारने २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
शासनाने परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली असून, या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांमध्ये सुट्टी असणार आहे. या सुट्टीमुळे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगारात कपात होणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये हा आदेश लागू राहील.
याशिवाय, जर कोणत्याही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण सुट्टी देणे शक्य नसेल, तर त्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत देणे बंधनकारक असेल. जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीनेच हा निर्णय लागू करता येईल. या परिपत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाऊ शकते.
राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून सर्व पक्षांनी आपल्या प्रचाराची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील वेगात सुरू असून, राज्यात निवडणुकीचे पडघम जोरात वाजत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*