छत्रपती संभाजीनगर : शहरातील जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर तब्बल १० कोटी ३२ लाख ४७ हजार ४२३ रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने आज (२२ मार्च) समितीचे कार्यालय व सचिव दालन सील करण्यात आले.

महानगरपालिकेच्या कर विभागाने ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपआयुक्त (कर) अर्पणा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

ही कारवाई सहायक आयुक्त प्राजक्ता वंजारी, कर अधीक्षक सचिन सोनी, तसेच अधिकारी मुकुल बांगर, दाभाडे, पगडे, इम्तियाज आणि नागरिमित्र पथकाच्या सहकार्याने करण्यात आली.

१० कोटींपेक्षा जास्त थकीत कर

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी होती. थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने अनेकदा नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, समितीकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्याने अखेर कठोर पाऊल उचलत आज कार्यालय सील करण्यात आले.

कर वसुलीसाठी महापालिकेची कडक भूमिका

महानगरपालिका प्रशासनाने शहरातील थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यासाठी नियमितपणे मोहिमा राबविल्या जात आहेत.

यापूर्वीही अनेक संस्थांचे कार्यालये आणि मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. कर न भरल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेच्या कर विभागाने दिला आहे.

थकबाकीदारांना इशारा

महानगरपालिकेने सर्व थकबाकीदारांना लवकरात लवकर कर भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,121 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क