छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तब्बल ९.५४ लाख वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी परिवहन विभागाने ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मात्र, राज्यभरातील वाहनधारकांचा प्रतिसाद कमी असल्याने ही मुदत वाढवून ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.
राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी बंधनकारक
परिवहन विभागाच्या नियमानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ लावणे आवश्यक आहे. या नंबर प्लेट्स चोरी आणि गैरवापर रोखण्यास मदत करतात. त्यामध्ये एक विशेष सुरक्षा कोड आणि बारकोड असतो, जो वाहनाच्या मूळ नंबरशी संलग्न असतो.
जिल्ह्यात केवळ ५ हजार वाहनांवर ‘एचएसआरपी’ बसविणे पूर्ण
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत फक्त २० हजार वाहनधारकांनी ‘एचएसआरपी’साठी ऑर्डर दिली आहे, तर त्यापैकी फक्त ५ हजार वाहनांवर प्रत्यक्षात ही प्लेट बसविण्यात आली आहे. राज्यभरातही हे प्रमाण कमी असल्याने परिवहन आयुक्त कार्यालयाने मुदतवाढ दिली आहे.
वेळेत बसवले नाही, तर दंडात्मक कारवाई शक्य
नवीन नियमावलीनुसार, ३० जून २०२५ पर्यंत ‘एचएसआरपी’ बसवले नाही, तर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवरून किंवा अधिकृत विक्रेत्याकडून ‘एचएसआरपी’ ऑर्डर करावी आणि बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*