छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या गैरवापराचे धक्कादायक उदाहरण शहरात समोर आले आहे. इंस्टाग्रामवरील रील्स आणि व्हिडिओ पाहून लॉक उघडण्याचे कौशल्य आत्मसात करणाऱ्या एका तरुणाने अखेर प्रत्यक्ष चोरी करून ती “कला” वापरली आणि पोलिसांच्या तावडीत सापडला.

अक्षय गजानन थोरात (वय २८, रा. ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे या आरोपीचे नाव असून, तो शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याने इंस्टाग्रामवरील विविध व्हिडिओ पाहून बंद दरवाजे उघडण्याची पद्धत शिकली आणि जवाहर नगर परिसरातील एका बंद अपार्टमेंटमध्ये घुसखोरी करत लॅपटॉप आणि दोन आयफोन चोरी करून पसार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फ्लॅटमध्ये अनेक दिवसांपासून कोणी राहत नव्हते. याच संधीचा फायदा घेत आरोपीने दरवाजा लोखंडी साधनाच्या मदतीने उघडला आणि फ्लॅटमधील महागडे गॅजेट्स घेऊन निघून गेला. मात्र, गुन्हेगारी बाजाराशी कोणताही संपर्क नसल्यामुळे त्याला हे गॅजेट्स विकता आले नाहीत.

जवाहर नगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे आणि सहायक फौजदार गजेंद्र शिंगाणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपीकडून २ लाख ३८ हजारांचा लॅपटॉप आणि दोन्ही आयफोन जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकारामुळे सोशल मीडियाच्या अतिवापराचे गंभीर परिणाम समोर आले असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,768 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क