“निर्भय होवून मतदान करा, आपल्या अधिकाराचा सन्मान करा” असे आवाहन करत औरंगाबाद (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कक्षातर्फे मतदार जनजागृती अभियान जोरात सुरू आहे. रविवार विभागीय क्रिडा संकुल, गारखेडा आणि एन-२, सिडको कामगार चौक मैदानावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध घोषणा दिल्या जात होत्या. “मतदान करा… मतदान करा, लोकशाहीसाठी मतदान करा” अशा घोषणांमुळे मैदान गजबजून गेले होते.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि निवडणूक निर्णय अधिकारी मा. चेतन गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कक्षाने शॉपिंग मॉल, बाजारपेठा, उद्याने, भाजीपाला विक्री केंद्रे, कमी मतदान झालेली मतदान केंद्रे, आरोग्य केंद्रे आणि वाहतूक सिग्नल याठिकाणी दररोज मतदार जनजागृती सुरू ठेवली आहे.
स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी सिताराम पवार आणि सहाय्यक विजय पाटोदी यांच्यासह रमेश अवचार, संतोष गाडेकर, चंद्रकांत पवार, कैलास जिने, विजय सोनवणे, भास्कर शिंदे, संजय जाधव, विजय गवळी, राजेश निंबेकर आणि राजेंद्र वाळके यांनी मतदान जनजागृती अभियानात सहभाग घेतला. संदेश लिहिलेले टी-शर्ट घालून आणि स्पिकर हातात घेऊन १०० टक्के मतदानाचे आवाहन करताना त्यांचे उत्साह नागरिकांना प्रेरणादायी ठरले. उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, या टिमसोबत फोटो काढले आणि एकतेचा संदेश दिला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*