शंभर-दीडशे लोकांसाठी सहा कोटी लोकसंख्येच्या समाजाचे नुकसान होऊ देणार नाही, असे ठाम वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केले. “शंभर लोक एकत्र आले तरी सर्वच तसे जमू शकत नाहीत. कुठलाही निर्णय घेताना समाजाचे नुकसान होणार नाही, याची मी दक्षता घेईन,” असे सूचक विधान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित समाज एकत्र आल्यास राज्यात शंभर टक्के परिवर्तन घडवता येईल, असे मत व्यक्त केले. “सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, कारण निवडणूक केवळ एका जातीवर लढवली जात नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
३० ऑक्टोबरची बैठक आणि पुढील निर्णय
“सध्या कोणालाही पाठिंबा दिलेला नाही,” असे स्पष्ट करत जरांगे म्हणाले की, “३० तारखेला एक बैठक आयोजित केली आहे, ज्यात मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोणता निर्णय निघतो, हे महत्त्वाचे आहे.” ३० ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरला अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*