छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाला गुरुवारी १० नवीन ई बस मिळाल्या असून, आता विभागाकडे एकूण ३८ ई बस आहेत. नव्याने आलेल्या ५ बस चिखली, १ मेहकर, तर शिर्डी आणि नाशिक मार्गावर धावणार आहेत. यामध्ये शिवशाहीच्या तुलनेत ई बसचे भाडे अधिक ठेवण्यात आले असल्याने वातानुकूलित बसचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना थोडा अधिक खर्च करावा लागणार आहे.

ई बसच्या आगमनामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल, तसेच पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून सरकारने हाती घेतलेल्या ई बस धोरणाची अंमलबजावणी येथेही सुरू झाली आहे. नव्याने आलेल्या बस बारा मीटर लांबीच्या आणि ४४ आसनी आहेत. या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर धावतील, तर पूर्वी आलेल्या नऊ मीटर लांबीच्या २८ ई बस सध्या जालना, सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर आणि बीड मार्गावर सेवा देत आहेत.

ई बस प्रवासात महिलांना ५०% भाडे सवलत, ज्येष्ठांना अर्धे भाडे आणि ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. त्यामुळे या बसना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिर्डी व नाशिक मार्गावरील बसचे फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्यांच्या भाडे व वेळेचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक पंडित चव्हाण यांनी दिली आहे.

मार्गानुसार ई बस भाडे:

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

545 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क