दिवाळीच्या सुट्या असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असून, शहरातील विविध उद्यानांमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सोमवारी महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात तब्बल साडेसात हजार पर्यटकांनी हजेरी लावली. या गर्दीमुळे महापालिकेला प्रवेश शुल्कातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
याचसोबत, टीव्ही सेंटर रोडवरील स्वामी विवेकानंद उद्यानातील अॅडव्हेंचर पार्कमध्येही चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. पर्यटकांसह नागरिकांनी कुटुंबांसह येथे सहलीचा आनंद घेतला. शहरात आलेले पर्यटक सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालय, नेहरू उद्यान, बोटॅनिकल गार्डन आणि स्वामी विवेकानंद उद्यान या ठिकाणी भरपूर मनोरंजनाचा अनुभव घेत आहेत.
सिद्धार्थ उद्यान सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहते, ज्यामुळे पर्यटकांना पुरेसा वेळ मिळतो. नेहरू उद्यान, बोटॅनिकल गार्डन आणि स्वामी विवेकानंद उद्यानांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे, ज्यात लहान मुलांसाठी खेळणी, मिनी ट्रेन, बुलेट ट्रेन आणि साहसी खेळांची सुविधा आहे. सोमवारी दिवसभरातील या गर्दीमुळे सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयास अनुक्रमे १ लाख ८ हजार रुपये व २ लाख ८ हजार रुपये असे मिळून एकूण उत्पन्न मिळाले आहे.
दिवाळीच्या सुट्या संपेपर्यंत शहरातील उद्यानांमध्ये पर्यटकांची गर्दी असाच कायम राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही त्याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*