गुप्तधन शोधण्याचा बहाणा करून संतोष सुरेश खिल्लारे (वय ३४) या युवकाची त्याचा मित्र मोहन साळवे (वय ४४, रा. मुकुंदवाडी) याने निघृण हत्या केली. ५ नोव्हेंबर रोजी संतोषला गुप्तधनाच्या नावाखाली जंगलात नेऊन विष पाजले, नंतर दगडाने डोके ठेचून त्याचा खून करण्यात आला. रविवारी सकाळी आडगाव बुद्रकच्या जंगलात संतोषचा मृतदेह सापडला आणि या हत्येचे तपशील उघड झाले.

संतोष हा सिंदीबन येथे पत्नी, तीन मुले आणि भावासह राहत होता. खासगी कंपनीत वेल्डर म्हणून काम करणाऱ्या संतोषची आणि मोहनची ओळख कामाच्या ठिकाणी झाली होती. दोघांमध्ये काही दिवसांपासून वैयक्तिक वाद होते, ज्यात संतोषने मोहनला एकदा जिवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे मोहनने संतोषची हत्या करण्याचा कट रचला.

५ नोव्हेंबर रोजी गुप्तधन शोधण्याच्या बहाण्याने मोहनने संतोषला आडगाव बुद्रकच्या जंगलात नेले. तिथे त्याला आधी दारूतून विष पाजले आणि नंतर दगडाने डोके ठेचून त्याची हत्या केली. संशय दूर करण्यासाठी संतोषचा मृतदेह दरीत ढकलून दिला.

संतोष बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी ६ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस तपासादरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोहन संतोषला दुचाकीवरून नेताना दिसला. शनिवारी रात्री मोहनला ताब्यात घेतल्यावर त्याने हत्या कबूल केली आणि घटनाक्रम उलगडला.

पोलिसांनी घटनास्थळावरून रिकामी विषाची बाटली जप्त केली असून, रविवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत संतोषचा मृतदेह दरीत झाडाला लटकलेला आढळला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,313 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क