छत्रपती संभाजीनगर येथील हडको एन-१२ परिसरातील व्हीआयपी रोडवरील शिलादीप कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सकाळी नर्सच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वृषाली शामराव डोईफोडे (वय ५१) यांनी या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

डोईफोडे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इन्चार्ज सिस्टर म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी संध्याकाळी त्या घराला कुलूप लावून आई-वडिलांकडे सिडको एन-९ मधील छायानगर हौसिंग सोसायटीत झोपण्यासाठी गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी त्यांच्या वॉचमनचा फोन आला, ज्यामध्ये त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असल्याचे सांगण्यात आले.

डोईफोडे घरी आल्यावर त्यांनी पाहिले की घरातील सेफ्टी गेट आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले होते. घरात असलेल्या गोदरेजच्या कपाटातील सोन्याचे दोन चैन, एक गोफ आणि १.२० लाख रुपये रोख असा एकूण ३.७० लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

सिडको पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

889 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क