छत्रपती संभाजीनगर शहरातील दिल्ली गेट परिसरात MD ड्रग्सची विक्री करण्यासाठी दोन व्यक्ती येणार असल्याची गुप्त माहिती सायबर पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार, सायबर पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी सापळा रचून दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांच्या जवळून १५ हजार रुपयांचे MD ड्रग्स आढळून आले.
अटक केलेल्या आरोपींची नावे अमन बेग आणि शहेजान शेख अशी आहेत. या दोघांविरुद्ध एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी केलेली ही कारवाई ड्रग्सविरोधी मोहिमेतील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*