औरंगाबाद  गारखेडा सूतगिरणी चौकात निवडणूक आचारसंहिता तपासणी पथकाने ४० लाखांची रोकड जप्त केली आहे. तपासादरम्यान ही रक्कम बिडकीन येथील व्यंकटेश मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची असल्याचे निष्पन्न झाले असून, ती पतसंस्थेच्या आंतरशाखा व्यवहारासाठी नेण्यात येत होती. मात्र, वाहनावर क्यूआर कोड नसल्याने ही रक्कम जप्त करून जिल्हा कोषागार कार्यालयात ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पूर्व विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक पारदर्शक राहावी आणि पैशाचे अमिष दाखवून मतदानाला प्रभावित करता येऊ नये, यासाठी प्रत्येक मतदारसंघात तपासणी नाके आणि भरारी पथके कार्यरत आहेत. गारखेडा सूतगिरणी चौकात आज एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. तपासणी दरम्यान वाहनचालक सचीन सुरसिंग जाधव यांची चौकशी करण्यात आली असता, ही रक्कम पतसंस्थेच्या आंतरशाखा व्यवहारासाठी असल्याचे समोर आले.

आचारसंहिता नियमांचे पालन न झाल्यामुळे आणि वाहनावर क्यूआर कोड नसल्याने निवडणूक विभागाने रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला. ही कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे, नोडल अधिकारी प्राजक्ता वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी पथकाचे नसीम शेख, एकनाथ पडूळ, सचीन सोनी, श्याम उदावंत, पोलीस कर्मचारी इंदलसिंग महेर, आणि व्हिडिओग्राफर आदींनी पार पाडली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,574 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क