छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा येथे शिवनेरी लॉन्सजवळ स्थिर पथकाने रविवारी रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेत पाहिले. पथकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो घाबरून वेगाने पळून गेला आणि त्याच्या हातातील काळ्या रंगाची रेक्झीनची बॅग रस्त्यावर पडली. पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅग तपासली असता त्यामध्ये 6 किलो चांदीचे दागिने, एक बिल बुक, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक आढळले.
या कागदपत्रांवरून ही बॅग नाशिक येथील अंकीत चंद्रकांत संचेती यांची असल्याचे स्पष्ट झाले. संचेती हे 20 ऑक्टोबर रोजी व्यापाराच्या निमित्ताने शहरात आले होते. त्यांनी मित्राच्या घरी मुक्काम केला होता, परंतु 21 ऑक्टोबर रोजी त्यांच्या गाडीची डिक्की उघडी आढळली व त्यामधील दागिन्यांची बॅग चोरीला गेली. त्यांनी याबाबत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तपासानंतर, या बॅगमधील दागिने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही बॅग मूळ मालकाला परत दिली जाणार आहे. दरम्यान, बॅग चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*