छत्रपती संभाजीनगर : भगवान महावीर जयंती उत्सव गुरुवारी, १० एप्रिल रोजी शहरात उत्साहात साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर महावीर चौक परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सकाळी पहाटे ५ वाजल्यापासून ते सकाळी १० वाजेपर्यंत काही मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी केले आहे.
वाहतूक बंद राहणारे मार्ग:
- छावणीचा लोखंडीपुल ते जिल्हा न्यायालयाकडे जाणारा व येणारा मार्ग
- कार्तिकी सिग्नल ते पंचवटी चौक तसेच महावीर चौक उड्डाणपुलाखालून जाणारा मार्ग
नागरिकांसाठी पर्यायी मार्ग:
- रेल्वेस्थानकाकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारी सर्व वाहने उड्डाणपुलाचा वापर करतील.
- रेल्वेस्थानकाकडून छावणी, पडेगाव, वाळुजच्या दिशेने जाणारी वाहने पंचवटी चौक मार्गे जातील व येतील.
- जिल्हा न्यायालयाकडून येणारी वाहने कोकणवाडी चौक मार्गे पंचवटी चौकातून पुढे जातील.
महावीर जयंतीच्या निमित्ताने शहरात मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*