मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सेवा १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत पाच दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या काळात पोर्टलवरील महसूल, शैक्षणिक प्रमाणपत्रे, उत्पन्न व जातीचे दाखले, जन्म-मृत्यू नोंदी यांसारख्या सर्व महत्त्वाच्या सेवा उपलब्ध होणार नाहीत.
माहिती तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) मार्फत विकसित करण्यात आलेल्या या पोर्टलवर राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु, नियोजित देखभाल आणि तांत्रिक सुधारणा करण्यासाठी पोर्टल काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे सेवा अधिक जलद आणि सुरळीतपणे देण्यास मदत होईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
महाऑनलाइन नागरी सेवाप्रमुख राहुल सुर्वे यांनी सांगितले की, सध्या शेती व शैक्षणिक हंगाम सुरू असल्यामुळे पोर्टलवर नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढतो. अचानक लोड वाढल्यास प्रणाली स्लो होऊ शकते, हे टाळण्यासाठी ही सुधारणा आवश्यक आहे.
या पाच दिवसांमध्ये नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी १० एप्रिलपूर्वीच आवश्यक कागदपत्रे, अर्ज किंवा सेवा पूर्ण करून घ्याव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे. ‘आपले सरकार’ पोर्टल १५ एप्रिल २०२५ पासून पुन्हा कार्यान्वित होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*