छत्रपती संभाजीनगर : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, ७ एप्रिलपासून राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांमध्ये ‘महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना’ सुरु होत आहे. या योजनेमुळे आता पात्र लाभार्थ्यांना कामगार रुग्णालयांतही मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. ही माहिती कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन फडणीस यांनी दिली.

‘ईएसआय’च्या वैद्यकीय लाभपरिषदेने या योजनेला मंजुरी दिली असून, त्यामुळे कामगारांसह सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांनाही उपचार घेता येणार आहेत. चिकलठाणा एमआयडीसीतील राज्य कामगार रुग्णालय हे १०० खाटांचे असून, येथे दररोज ७०० ते ८०० रुग्ण ओपीडीमध्ये उपचारासाठी येतात. तर आंतररुग्ण विभागातील ६७ टक्के खाटा सतत भरलेल्या असतात.

‘महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना’ अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा सुविधा मिळते. आतापर्यंत ही सेवा खासगी रुग्णालयांमध्येच मर्यादित होती. मात्र, आता सरकारी कामगार रुग्णालयांमध्येही ती सुरु झाल्याने मोठ्या संख्येने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

या निर्णयामुळे कामगार, गोरगरीब, वंचित आणि दुर्बल घटकातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या रुग्णालयात दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, सरकारी आरोग्य व्यवस्थेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असेही डॉ. फडणीस यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

779 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क