कन्नड शहरातील शांतीनगर येथील ८६ वर्षीय शकुंतला मारुती अनवडे यांनी गुरुवारी स्वतःच्या राहत्या घरीच मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात गृह मतदानाची सुविधा दिली गेली असून, अनवडे आजींचे मतदान विशेष ठरले. कारण जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवण्यासाठी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने ८५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींना, जे मतदान केंद्रावर जाऊ शकत नाहीत, गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच अंतर्गत कन्नड मतदारसंघात गृह मतदान प्रक्रिया सुरू असून, जिल्हाधिकारी स्वामी यांच्या नेतृत्वात पथकाने शकुंतला अनवडे यांचे मतदान नोंदवले.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, गृह मतदान पथक क्रमांक १ चे अधिकारी संदीप महाजन, संदीप पाटील, अनिता जालनापुरकर, पोलिस कर्मचारी गिरी, सूक्ष्म निरीक्षक संजय देशपांडे यांच्यासह टपाली मतदान कक्षाचे योगेश मुळे व दिलीप मगर उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*