शेंद्रा एमआयडीसीमधील पंचतारांकित रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीतील मक्याच्या तीन हजार टन क्षमतेच्या टाकीचा स्फोट झाल्याने शुक्रवारी भीषण दुर्घटना घडली. या घटनेत चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने तत्काळ हस्तक्षेप केला. विभागाचे अप्पर संचालक डॉ. राम दहिफळे यांनी शनिवारी कंपनीला भेट देऊन प्राथमिक चौकशीची प्रगती जाणून घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना दुर्घटनेच्या मूळ कारणांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आणि मृतांच्या कुटुंबियांना शक्य तितकी मदत देण्याचे आदेश दिले.
कंपनीच्या वतीने मृत कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २२ लाख रुपयांचे आर्थिक अनुदान (१४ लाख सानुग्रह अनुदान व ८ लाख विमा रक्कम) तसेच त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमित कामगार दत्तात्रय बोदरे यांच्या कुटुंबाला ४० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान व त्यांच्या वारसाला दरमहा ३५ हजार रुपयांचे वेतन देण्यात येणार आहे.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे विभागीय सहसंचालक प्रमोद सुरसे व उपसंचालक धीरज खिरडकर यांनी घटनेच्या दिवशीच प्राथमिक चौकशी केली होती. अधिक तपासासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना राज्य कामगार विमा कंपनीकडून पेन्शनही दिली जाणार आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*