छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात खरीप हंगामातील पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कपाशी पिकांवर मावा आणि तुडतुडे कीडांचा हल्ला झाला आहे, तर गोबी आणि टोमॅटो पिकांवर गोगलगायींचा प्रकोप झाला आहे. शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करूनही कीटकांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.
यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पूर्वीच्या हंगामांमध्येही गोगलगायींनी शेतकऱ्यांना मोठे नुकसान केले होते. या संकटावर मात करण्यासाठी आणि आर्थिक तोटा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*