संभाजीनगर शहरात मंगळवारी (ता. ६) एकाच दिवशी तीन व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सौरभ पाटील (वय २४), सुहाना शेख (वय १४), आणि रोहित भरत खोपडे (वय २८) अशी मृतांची नावे आहेत.
प्रथम, रोहित खोपडे या अभियंत्याने, आपल्या लग्नानंतर फक्त दीड महिन्यांनी, वाळूज परिसरातील आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस तपास सुरू आहे.
दुसऱ्या घटनेत, हर्सुल परिसरातील चेतनानगर पोलीस कॉलनीत राहणारी १४ वर्षीय सुहाना शेख हिने भाऊ रागावल्यामुळे स्टडी रूममध्ये जाऊन गळफास घेतला. तिच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तिसऱ्या प्रकरणात, सिडको परिसरात राहणाऱ्या सौरभ प्रमोद पाटीलने नैराश्यामुळे गळफास लावून आत्महत्या केली. सौरभने आत्महत्येपूर्वी आपल्या बहिणीला फोन करून आई-वडिलांची विचारपूस केली होती.
या तिन्ही घटनांमुळे संभाजीनगर शहरात अस्वस्थता पसरली असून, पोलीस तपास सुरू आहे. शोकाकुल कुटुंबांना धीर देण्याचे आवाहन केले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*