छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येणार आहे. तसेच शेंद्रा व बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रियल रिंगरोड तयार करून, इलेक्ट्रिक वाहन (EV) क्लस्टरसाठी पाच एकर जागा दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

एमआयटी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (CMIA) तर्फे आयोजित ‘उद्योग पुरस्कार 2025’ च्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री अतुल सावे, सीएमआयचे अध्यक्ष अर्पित सावे, सचिव अथर्वेशराज नंदावत, उद्योगपती अनुराग जैन व राम भोगले उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हे राज्याचे मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट ठरणार असून, येथे औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. जायकवाडी धरणावर देशातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमुळे येथे पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी तयार झाली आहे.

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे ५० टीएमसी पाणी वळवण्याचा प्रकल्प शासन राबवणार आहे. तसेच शक्तिपीठ महामार्ग व वाढवण बंदराच्या जोडणीमुळे उद्योगांना चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमात मराठवाड्यातील उल्लेखनीय उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

991 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क