छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावर शनिवारी (२६ एप्रिल) पहाटे दीड वाजता भीषण अपघातात ३२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवन गौतम खिल्लारे (रा. मिसारवाडी) असे मृताचे नाव आहे. पवन पत्नीला भेटून घरी परतत असताना त्याच्या दुचाकीला पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली.

पवन खासगी नोकरी करीत होता व आपल्या कुटुंबासोबत राहत होता. शुक्रवारी रात्री पत्नीला भेटण्यासाठी तो राहुलनगर येथे सासरवाडीत गेला होता. परतत असताना दोन हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरने त्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकरदेखील उलटला व पुलावर दोन्ही वाहनांच्या पेट्रोल टाक्या फुटून तेल सांडले, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.

अपघाताची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पवनला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला व छातीला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अग्निशमन दलाने रस्त्यावर पाणी मारून रस्ता स्वच्छ केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अपघातानंतर टँकर चालक वाहन तेथेच सोडून फरार झाला असून, त्याचा शोध वेदांतनगर पोलीस घेत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,715 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क