छत्रपती संभाजीनगर : छोट्याशा वादातून तिघांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हॉटेलमध्ये जोरदार हल्ला चढवला. विशेष म्हणजे एका आरोपीने पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जालना रोडवरील सिडको परिसरात ‘हॉटेल कलिंगा’ येथे घडली. या प्रकरणी रविवारी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आशिष वसंतराव पवार (रा. औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते त्यांच्या मित्रासह जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्या वेळी बाजूच्या टेबलवर कार्तिक लोकल (रा. गारखेडा), कमलेश मुदिराज आणि जीवन कुरेवार हे आरोपी बसले होते. फोन आल्याने आशिष पवार बाहेर गेले आणि परत आल्यावर त्यांनी पाहिले की तिन्ही आरोपी मित्र मनोज महाले यांना बेदम मारहाण करत होते. कार्तिक लोकलने कमरेवरील पिस्तूल काढून महाले यांच्या दिशेने रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाण थांबवण्यासाठी पवार यांनी हस्तक्षेप केला असता त्यांनादेखील मारहाण करण्यात आली.

या घटनेनंतर सिडको पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल व सहा ‘राऊंड’ जप्त केले. चौकशीत पिस्तूल हे एअरगन असल्याचे समोर आले असून, त्यातून फायर केल्यास मोठा आवाज होतो आणि जाळ निघतो. त्यामुळे जवळून फायर केल्यास गंभीर इजा होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलीस करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,705 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क