मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी घेतलेली २९ ऑगस्टची बैठक पुढे ढकलली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने, आता ही बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
जरांगे पाटील यांनी म्हटले की, “निवडणुका लांबल्यामुळे आपले डावपेच सरकारला कळू द्यायचे नाहीत. त्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर होईल, त्यावेळेस बैठक घेण्याचा विचार आहे.”
इच्छुक उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या असून, २४ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांच्या अर्जांची छाननी करून ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या बैठकीत मराठा समाजाच्या राजकीय आंदोलनाची दिशा ठरवली जाणार होती. पण आता निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयावर याबाबतचे अंतिम निर्णय घेतले जातील.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*