शहरात सोमवारी मध्यरात्री जोरदार पावसामुळे औट्रम घाटात दरड कोसळली, त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे घाटातील दरडी ठिसूळ झाल्याने, सुरक्षिततेच्या कारणास्तव काही काळासाठी या घाटातून वाहतूक बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.

दरड कोसळल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग आपत्ती निवारण पथकाने त्वरित पावले उचलली आणि अवघ्या दोन तासांत दरड हटवून रस्ता मोकळा केला. यानंतर, पोलिसांच्या विनंतीनुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घाटातील पोलिस चौकीसाठी पोर्टेबल केबिनची व्यवस्था केली.

एनएचएआयच्या तज्ज्ञ समितीने कन्नड घाटातील चार पर्यायी मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. केंद्र शासनाच्या निर्णयानंतर खंडपीठास याबाबत सूचित करण्यात येईल, असे एनएचएआयचे वकील सुहास उरगुंडे यांनी खंडपीठासमोर मांडले.

एनएचएआयने घाटातील मार्ग तत्काळ मोकळा केल्याबद्दल खंडपीठाने त्यांच्या कामाची प्रशंसा केली. या प्रकरणात मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरार आणि केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी काम पाहिले.

दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घाट काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विश्रांती गृह, पिण्याचे पाणी, रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तथापि, अरुंद रस्ता आणि अभयारण्याच्या मर्यादांमुळे घाटात या सुविधा देणे शक्य नसल्याचे एनएचएआयने स्पष्ट केले आहे. मात्र, घाटाच्या सुरुवातीस व शेवटी या सुविधा पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,660 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क