छत्रपती संभाजीनगर : शहरातील संजयनगर परिसरात लहानग्या मुलीवर घरमालकाने चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शफिक खान हनीफ खान (वय ३८) याला अटक केली आहे.
संजयनगर भागात नुकतेच एक कुटुंब भाड्याने राहण्यासाठी आले असून त्यांची ५ वर्षांची मुलगी घराबाहेर अंगणात खेळण्यासाठी गेली होती. त्याच वेळी आरोपी शफिक खान घरात एकटाच होता. त्याने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला.
पीडित मुलीचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते तर आरोपी तळमजल्यावर वास्तव्यास आहे. आरोपीच्या वडिलांची ही चार मजली इमारत असून, इतर मजल्यांवरही भाडेकरू राहतात.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण केले. समितीच्या सदस्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, “शफिक अंकलने हे केलं” असे चिमुरडीने स्पष्ट सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. संपूर्ण परिसरात या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*