छत्रपती संभाजीनगर :  शहरातील हर्सूल परिसरातील बारव रोडवरील गोविदराज अपार्टमेंटमध्ये बुधवारी (ता. १६ एप्रिल) सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे ४४,००० रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेली. 

फिर्यादी संजय किसनराव दसरे (४४) हे सकाळी नोकरीसाठी बाहेर गेले होते. त्या वेळेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकर उघडले. लॉकरमध्ये ठेवलेली सात ग्रॅम वजनाची गळ्यात घालण्याची सोन्याची साखळी, सात ग्रॅम वजनाची सोन्याची पिळाची अंगठी, एक ग्रॅमची सोन्याची कडी आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४४,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्सूल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिस हवालदार ठाणगे हे पुढील तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,147 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क