महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, महायुतीने पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी आपला मार्ग मोकळा केला आहे. यावेळी शिंदे गटाला देखील उल्लेखनीय यश मिळाले आहे. अशातच शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी शपथविधीपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सामंत यांनी दावा केला आहे की, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पाच आमदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यांनी सांगितले की, “या आमदारांपैकी दोन-तीन वगळता इतर सर्व आमदार लवकरच आमच्याकडे येतील. रात्रीपासून हे आमदार आमच्या संपर्कात आहेत.”
यावेळी सामंत यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रथमच कोकणातून दोन सख्खे भाऊ निवडून आले आहेत. किरण सामंत आणि उदय सामंत तसेच निलेश राणे आणि नितेश राणे हे दोन सख्खे भाऊ विधानसभेत आले आहेत.”
उदय सामंत यांनी कोकणाच्या विकासासाठी शिंदे गट कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, उबाठाचे काही निवडून आलेले आमदारही लवकरच शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील,” असेही ते म्हणाले.
ईव्हीएममधील गडबडीचा मुद्दा
ईव्हीएमवर होणाऱ्या आरोपांबद्दल सामंत म्हणाले, “जो धनुष्यबाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता, तो आम्ही मिळवला आहे. गद्दारी कोणी केली हे लोकांना दाखवून दिले.”
हा गौप्यस्फोट आगामी राजकीय घडामोडींना नव्याने वळण देणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*