छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुकांदरम्यान डीजेच्या प्रचंड आवाजाने सामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांनाही त्रास झाल्याची तक्रार समोर आली आहे. याची गंभीर दखल घेत क्रांती चौक पोलिस ठाण्यात तब्बल ३१ डीजे चालक आणि आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवासी भागात ध्वनीमर्यादा ५५ डेसिबलपर्यंत असावी, अशी नियमावली आहे. मात्र पोलिसांच्या तपासणीत काही ठिकाणी आवाज १३५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले. त्यामुळे हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

जयंती शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त बगाटे यांनी शांतता समिती बैठकीत आयोजकांना ध्वनीमर्यादा पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेकांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महिलांनीही “अतिआवाजामुळे मिरवणुकीत नाचतानाही आनंद मिळाला नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.

सायंकाळी ७ नंतर क्रांती चौक ते गुलमंडीदरम्यान अनेक ठिकाणी आवाज मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. पोलिसांनी आयोजकांना प्रत्यक्ष सांगूनही त्यांनी आवाज कमी केला नाही. त्यामुळे ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सिडको पोलिस ठाण्यात आणखी ७ जणांविरुद्ध गुन्ह्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

यापुढे महापुरुषांच्या जयंतीत डीजे बंद ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी डीजे बंद आंदोलनाचा निर्धार केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,657 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क