भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री मा.ना. श्री. राजनाथसिंह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत असून, ते सिडको कॅनॉट प्लेस येथे होणाऱ्या शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या भव्य कार्यक्रमासाठी शहर, जिल्हा तसेच परजिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरात नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. त्यामुळे सुरक्षितता व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाने काही मार्गांवर नियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, १८ एप्रिल रोजी दुपारी १ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खालील मार्गांवर सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे:

1. रामगिरी हॉटेल (अग्रेसन चौक) ते हॉटेल शिवा

2. चिश्तिया चौक ते सिडको एन-१ चौक

3. सपना मोमोज ते एस.बी.आय. बँक कॉर्नर

4. कॅनॉट परिसर

पर्यायी मार्ग:

  • रामगिरी हॉटेल ते जळगाव टी, हायकोर्ट सिग्नल, सेव्हनहिल पुलाखालून, मनियार चौक, द्वारकादास शामकुमार चौक, चिश्तिया चौक
  • सप्तश्रृंगी चौक, जिजामाता कन्या विद्यालय, धर्मवीर संभाजी विद्यालय, अविष्कार चौक, चिश्तिया चौक
  • रामगिरी चौक ते जळगाव टी आणि तेथून एस.बी.आय. बँक चौक

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवा व मान्यवरांच्या वाहनांना या बंदी आदेशातून सूट देण्यात आली आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३१ व इतर फौजदारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) धनंजय पाटील यांनी दिला आहे.

नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, गर्दी टाळावी आणि सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,066 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क