शहरात बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळी ७ वाजेपासून मध्यरात्री १ वाजेपर्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. तब्बल ४ हजार पोलिस या बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. शहरातील ७२ संवेदनशील ठिकाणी बुधवारी रात्रीपासूनच पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
छावणी हद्दीतील विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे बुधवारी निघणार आहे. सुरक्षिततेसाठी प्रत्येक गणेश मंडळासोबत एक अंमलदार नियुक्त करण्यात आला आहे. या बंदोबस्तात ४ उपायुक्त, ७ सहायक पोलिस आयुक्त, ४५ पोलिस निरीक्षक, १४० सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, ३ हजार पोलिस अंमलदार, ५०० होमगार्ड, २७४ वाहतूक पोलिस अंमलदार, एसआरपीएफचे ७१ शस्त्रधारी जवान, आणि दंगाकाबू पथकाचे २ उपनिरीक्षक व १११ जवान तैनात असतील.
विविध भागात २० तासांपेक्षा अधिक काळ गस्त ठेवण्यात येणार आहे, तर २१ अतिसंवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट ठेवले आहेत, ज्याची जबाबदारी १६ अधिकारी व ८४ अंमलदार सांभाळणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*